देवळा प्रतिनिधी:
संविधान गुण गौरव समिती रायगड व ईगल सोशल ग्रुप यांच्या मार्फत संविधान गुण गौरव परीक्षा कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा येथे घेण्यात आली “आपले ध्येय संविधान जनजागृतीसाठी भावी पिढीच्या उत्कर्षासाठी”या शिर्षका खाली ही परीक्षा घेण्यात आली.तत्पूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय राज्यघटनेचे महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्रजी आहेर यांच्या हस्ते पुजन करुन,पुष्पहार अर्पण करुन परीक्षेला सुरवात करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक डॉ.स्वप्निल गरुड बोलत होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व महापुरुषांच्या विचारांचा भारत निर्माण करण्यासाठी दिवस-रात्र एक करुन रक्ताचे पाणी करुन जगातिल सर्वात मोठा लिखित स्वरुपातील ग्रंथ निर्माण केला तो म्हणजे ‘भारतीय संविधान’हे भारतीय संविधान आपली राज्यपध्दती नसून जीवन पद्धती आहे असा विचार करुनच आपण संविधान वाचले पाहिजे त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे तरच आपले घडणारे पुढील आयुष्य आधिक समृद्ध होईल. कारण रक्ताचा एक थेंबही न सांडता बाबासाहेबांनी केलेली ही जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठी क्रांती आहे. संविधान जनजागृती व्हावी या उद्देशाने ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे हे दुसरे वर्ष आहे.आज महाराष्ट्रात संविधान आणि संविधानामधील कायदे जाणून घेणारी नविन पिढी उदयास येताना दिसते आहे.संविधान घराघरात पोहोचले पाहिजे लोक संविधान वाचक झाले पाहिजेत तरच भारत प्रगतीपथावर जाईल.आज आरक्षण आणि राज्यघटना बदलली जाईल हे मुद्दे खूप गाजताना दिसत आहेत पण आरक्षण म्हणजे नेमके काय हेच आम्हाला समजलेले नाही.
आरक्षण म्हणजे सवलत नसून ‘प्रतिनिधित्व’ आहे हजारो वर्ष गुलामीत राहिलेल्या मानवजातीला आपल्याच भारतात माणूस म्हणून जीवन जगता येत नव्हते त्यांनाही सर्वांसोबत समानतेने जीवन जगता यावे शिक्षणाची समान संधी मिळावी म्हणूनच त्यावेळच्या मागास असलेल्या जातींना आरक्षण दिले गेले आणि आज आपण बघतो आहोत आरक्षण हा राजकीय मुद्दा होऊन समाजा समाजामध्ये द्वेष निर्माण करुन आपली राजकीय पोळी भाजताना सर्व राजकीय पक्ष दिसत आहेत म्हणूनच संविधान साक्षर होणे संविधानाची जनजागृती होणे आज गरजेचे झाले आहे. असे प्रतिपादन डॉ.गरुड यांनी केले. या प्रसंगी डॉ.विलास वाहुळे,प्रा.चंद्रकांत दाणी,प्रा.अमित बोरसे व सर्व परीक्षार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post