सेनगांव तालुक्यातील पानकनेरगांव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता भेट दिली. शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी गोयल यांनी निपुण हिंगोली हा उपक्रम हाती घेतला असून त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा स्तर निश्चित करून गुणवत्ता वाढीसाठी कृतीयुक्त कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना दिल्या तसेच सर्व शाळांनी कृतीयुक्त शिक्षणाचे नियोजन करून विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन गुणवत्ता वाढवण्याच्या सूचना देखील दिल्या.

Discussion about this post