राज्यातील महायुती शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करून महिलांच्या वतीने राज्य शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.
महिलांना आणि मुलींना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे त्या आत्मनिर्भर व्हाव्यात आणि त्यांच्या आरोग्य पोषणामध्ये सुधारणा व्हावी यासाठी राज्यातील महायुती शासनाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण महिलांच्या हिताची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून या योजनेत पात्र असलेल्या महिलांना दरमहा त्यांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सदर योजनेच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात १५ ऑगस्ट रोजी पहाटे पासून दोन महिन्याचे तब्बल तीन हजार रुपये जमा होत असल्याने भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांचा लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात यथोचित सत्कार करून महिलांनी महायुती शासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, बन्सी भिसे, महिला आघाडीच्या सुरेखा पुरी, अनुसया फड, लता भोसले, शीला आचार्य यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रातील नरेंद्रजी मोदी आणि राज्यातील महायुती शासन महिलांच्या हिताची जपणूक करणारे आणि महिलांसाठी विविध योजना सुरू करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे शासन आहे असे सांगून यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, काँग्रेसच्या काळात तोंड बघून योजना दिल्या जात होत्या मात्र भाजपा शासनाने जात धर्म न पाहता गरजू आणि पात्र सर्व लाभार्थ्यांना घरकुल, उज्वला गॅस, लाडकी बहीण, बस प्रवासात सवलत यासह विविध योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ दिला. येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या भूलथापांना अपप्रचाराला बळी न पडता विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ देणाऱ्या भाजपाच्या विजयासाठी महिलांनी बहिणींनी कष्ट घ्यावेत असे आवाहन केले.
यावेळी लता भोसले, माया घोडके, सुरेखा मुळे, ज्योती लांबोटे यांच्यासह अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजने बद्दल शासनाचे आभार व्यक्त केले. बहुतांशी महिलांनी आ रमेशआप्पा कराड यांना मोबाईलवर आलेले मेसेज दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी अनुसया फड यांनी आभार मानले. यावेळी रोहिणी जुगल, उषा शिंदे, रुपावती हनवते, श्रुती सवयी, अन्नपूर्णा पुरी, पुष्पा आकुच, कांचन बनसोडे, मनकर्ना यमजले, रुक्मिणी माने, उमा सूर्यवंशी, राणी कांबळे, कीर्ती अवस्थी, राधा लहाडे, कल्पना मस्के, छाया जोगदंड, रमा जोगदंड, मीरा फड, वसुधा तोडकरी, मीना सूर्यवंशी, अर्चना शिंदे, मंगल शिंदे, मीना पवार, केशरबाई भुतकर, अर्चना यशवंते, अर्चना आरबाडे, सारिका बोबडे यांच्यासह महिलांची संख्या मोठी होती.
Discussion about this post