. या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात आदल्या दिवशी विज्ञान दिंडीने झाली. या विज्ञान दिंडीत शाळेतील विद्यार्थी शिक्षक पालक सहभागी झाले होते. या दिंडी सोहळ्यात पालखीत भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि थोर शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमेबरोबरच विज्ञानाचे ग्रंथ आणि साहित्य यांची पालखीत मिरवणूक काढण्यात आली होती.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी थोर शास्त्रज्ञ आणि वारकऱ्यांची वेशभूषा धारण केली होती. दिंडीतील दिंडीतील घोषवाक्य आणि शास्त्रज्ञांची फोटो लक्ष वेधून घेत होती. भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विज्ञान नगरी इथे पार पडलेल्या प्रदर्शनात 108 प्रयोग दाखल करणे झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन गावचे सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे यांच्या हस्ते झाले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी चकोर आर. व्ही. गटशिक्षणाधिकारी काळमाते डी. एम. एपीआय कल्याण नेहरकर, विस्तार अधिकारी सुशील राव फुलारी आणि संतोष माळी, उपसरपंच अमोल माकोडे, माझी जि प सदस्य शहाजी दादा पाटील, माजी सरपंच पद्माकर पाटील, केंद्रप्रमुख सय्यद ए एम, ग्रामपंचायत सदस्य ज्योती महाजन आणि बेबी नंदा गोरे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील,
माजी चेअरमन नासिरभाई पठाण इत्यादी जण उपस्थित होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन वैज्ञानिक अविष्कार दाखवून करण्यात आली. या प्रदर्शनात प्रामुख्याने दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी वाहतूक दळणवळण, नैसर्गिक शेती, अन्न आरोग्य आणि स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन या विषयावर
आपले प्रयोग सादर केले होते. त्याचबरोबर प्रदर्शन स्थळी के एन मराठी प्राथमिक विभागाच्या वतीने कालबाह्य होत असलेल्या शेती अवजारांचे आणि ग्रह उपयोगी दुर्मिळ वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये लाकडी तिफन, मोगडा,कुळव, डुबरे, पेरणी चाडे, मुंगसे बळी नांगर पूर्वी घरात वापरत असणाऱ्या जातं, पाटा वरवंटा, काटवट, संदूक, सलदा, रवी मुसळ यांचे प्रदर्शन भरण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ
गावातील आणि परिसरातील असंख्य विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात घेतला. शाळेच्या वतीने मंडप स्वागत कमानी आकर्षक रांगोळी नाष्टयाची सोय केल्यामुळे आलेली स्पर्धक भारावून गेले. या स्पर्धेचा निकाल परीक्षकांनी घोषित करून त्यामध्ये प्राथमिक गटातून जिल्हा परिषद सौंदना या शाळेने प्रथम, कॅनव्हास इंग्लिश स्कूल कळंब यांनी द्वितीय,
तर ज्ञान प्रसार विद्यालय मोहा यांनी तृतीय क्रमांक मिळविला. माध्यमिक गटातून हनुमान विद्यालय घारगाव यांनी प्रथम क्रमांक, शरदचंद्र विद्यालय खोंदला यांनी द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक ज्ञानद्योग विद्यालय येरमाळा या शाळेने मिळविला. तरशिक्षक साठी असलेल्या अध्यपण शैक्षणिक साहित्य निर्माण स्पर्धेत प्राथमिक गटातूनधनराज बनकर प्रथम, सुनील घाटूळे यांनी दवतीय क्रमांक मिळविला
तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक तुकाराम गरुडे, सेकंड क्रमांक श्रीमती नीता सोनवणे यांनी मिळविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडागळे आणि खांडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांनी केली.
हा कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठीविस्तार अधिकारी संतोष माळी आणि मुख्यध्यापक गुणवंत घोगरे व शाळेतील सर्वच शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Discussion about this post