यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आजकाल शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात यंत्र आल्यामुळे छोट्या छोट्या शेतकऱ्यांना बैल जोडी परवडत नसल्याने गावोगावी बैलजोडीचे प्रमाण कमी होत चालल्याचे चित्र दिसत आहे. अशाही परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांकडे गाई बैल दिसत आहेत. विशेष म्हणजे ज्या बैलांचे गाईचे वय झाले आशाची सेवा करणारे देखील शेतकरी आजही दिसत आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेल्या कामारी येथील शेतकरी सूर्यवंशी( देशमुख )परिवाराने तर आपल्या शेतात राबराब राबवून मशागत करणाऱ्या ढवळ्या बैलांना 5 जानेवारी 2025 रोजी 25 वर्षपूर्ती कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दुपारी १२:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे
सायंकाळी ७:०० वाजता सत्यपाल महाराजांचे शिष्य संदीप पाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवहान बालाजी सूर्यवंशी विनोद सूर्यवंशी गजानन सूर्यवंशी धोंडूराम सूर्यवंशी मारुती सूर्यवंशी यांनी केले आहे. मुक्या जनावराचे महत्त्व आमच्या बळीराजाशिवाय कोण जाणार शेतकऱ्याच्या कष्टात आणि श्रीमंतीत कित्येक पटीचा वाटा हा गाई बैलांचा असतो .त्याच्याच कष्टाच्या जोरावर ही काळी आई फुलली.
आणि आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आली. स्वार्थ कळायला भावना लागतात पण त्या भावना कळत बोलता येत नसल्यामुळे निस्वार्थ काळया मातीत त्यांनी केलेले कष्ट उभ्या आयुष्यात आम्ही फेडू शकत नाही.
त्या निमित्ताने सूर्यवंशी परिवाराने आमच्या परिवारातील सदस्याला म्हणजे ढवळ्या बैलाला पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले आहे .लाडक्या बैलांना निरोगी आयुष्य लाभावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मारुती सूर्यवंशी देशमुख यांनी सांगितले
Discussion about this post