एक काळ होता…
एक काळ होता की या विद्वानांमुळे खुर्ची ला महत्व आलं होतं
ज्ञानाचा कोणता अहंकार नव्हता, शिक्षण घेतल्याची बोगस डिग्री दाखवण्याची गरज नव्हती. यांच्या वागण्यात बोलण्यात सहजता, साधेपणा होता. टीका सुद्धा त्यांची सल्ला वाटावा अशी होती. द्वेष नव्हताच, राहणीमानात बडेजाव नव्हता, आणि प्रतिकुल परिस्थिती मध्ये देश सांभाळण्याची ताकद होती. पूर्वजांच्या नावाने कधी बोटं मोडली नाहीत, ना कधी रडून सहानभूती मिळवायची गरज त्यांना पडली नाही. एवढे विद्वान असून खोटे आकडे सांगून देश व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा विचार सुध्दा यांच्या मनात येत नसे. गढुळ राजकारणापेक्षा देश आणि देशातील माणसांचं जगणं जास्त महत्वाचं वाटत होतं. राजकारणाचा हा काळ फार जुना नाही तर फक्त १०-१५ वर्षापुर्वीचा आहे….. हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे.…
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Discussion about this post