. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्हृातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची योजना जिल्हा पोलीस अधीक्षक
मा. श्री. विश्व पानसरे, अपरb पोलीस अधीक्षक, बुलढाणा श्री. बी.बी महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, खामगाव श्री.अशोक थोरात यांनी आखली व सदरची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री. अशोक लांडे यांना देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे
यांनी स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथील सफौ गजानन माळी, पोकॉ. जयंत बोचे, अमोल शेजोळ व TAW (सायबर लॅब), बुलढाणा येथील पोहेकॉ पवन मखमले व कैलास ठोंबरे यांचे पथक गठीत करुन त्यांना दैनदिन कामकाजासोबतच गहाळ मोबाईल फोनचे शोध कार्य सुरु करण्याचे आदेश पारीत केले.
सदर आदेश मिळताच मागील ३ महीन्यामध्ये जिल्हृातुन व जिल्हृाबाहेरुन ७१ गहाळ मोबाईल किंमत अंदाजे ९,२३,००० रु.चे शोध घेऊन हस्तगत केले आहे. यापुर्वी एलसीबीने व विविध पो.स्टे.स्तरावरुन १५२ असे एकूण ३८२ मिंसीग मोबाईलचा शोध घेऊन मुळ मालकास सुपुर्त केलेले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केलेले मोबाईल संबंधीत मुळ मालकास परत करण्याच्या उदात्त हेतुने दिनांक २७ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे मोबाईल वाटप संदर्भातील विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन मा. श्री. विश्व पानसरे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे शुभहस्ते उपस्थित मुळ मालकास मोबाईल सुपुर्द करण्यात आलेले आहे.
तसेच उर्वरीत मोबाईल त्यांचे मुळ मालकांना स्थानिक गुन्हे शाखा, बुलढाणा येथुन सुपुर्त करण्यात येत आहे. हरविलेले, गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री बी.बी.महामुनी, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा, श्री अशोक थोरात,
अपर पोलीस अधिक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या आदेशाने सफौ.गजानन माळी, पोकॉ जयंत बोचे, अमोल शेजोळ व TAW (सायबर लॅब) चे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे,
पोलीस अंमलदार राजु आडवे, पवन मखमले, उषा वाघ, कैलास ठोंबरे, ऋषिकेश खंडेराव चे पथकाने मोबाईलचा शोध घेवुन ७१ गहाळ झालेले मोबाईल विविध ठिकाणाहुन एकत्र व मुळ मालकास परत करण्याची महत्वपुर्ण कामगिरी केलेली आहे.
Discussion about this post