.प्रतिनिधि: मनोज वाजे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील विनायक नगर येथे दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी प्रगती गाव विकास समिती यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते.यावेळी विठ्ठल रुक्माई देवतेचे मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सरपंच यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
आलेल्या मान्यवरांचे गाव विकास समिती मार्फत स्वागत करण्यात आले.मनोहर कांबळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.नयन धाडवे सर यांनी शिबिर बाबत माहिती दिली.गावातील सरपंच , उपसरपंच आणि ग्रामस्थ ,महिला, पुरुष स्वदेस मित्र हे उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिर मध्ये लाभार्थीचे वजन ,उंची ,शुगर ,बीपी सर्व रोग निदान
,महिला तपासणी आणि औषधी लाभ देण्यात आला.तसेच SMBT हॉस्पिटल ,प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिले येथील स्टाफ आणि स्वदेश प्रतिनिधी डॉ.सचिन अहिरे,गणेश थोरात,नयन धाडवे,
मनोहर कांबळे,भूषण राजभोज,गिरीश गावित हे उपस्थित होते..गावातील अजून 160 लोकांची तपासणी करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वदेस मित्र,गावविकास समिती तसेच मास स्कॉलरशिपचे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले…..सारथी महाराष्ट्राचा न्यूज प्रतिनिधी मनोज वाजे त्र्यंबकेश्वर
Discussion about this post