सावंतवाडी, ता. २८: सायबर गुन्हे घडल्यानंतर आता ऑनलाइन तक्रारीची गरज नाही तर त्याची स्थानिक पोलिस दखल घेणार आहेत. तशा सूचना सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही, अशी भूमिका जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आज येथे व्यक्त केली.
दरम्यान अशा गुन्ह्यानंतर एखादा तक्रारदार गरीब असल्यास त्यांना सरकारी वकिलाची मदत मिळू शकते. मात्र त्यासाठी त्यांनी तशी मागणी करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सायबर सुरक्षा भारत, नशा मुक्ती डायल ११२ उपक्रम अंतर्गत आज सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस उपविभागीय अधीक्षक विनोद कांबळे आदी उपस्थित होते.
Discussion about this post