प्रवीण इंगळे, —– विडुळ प्रतिनिधी
उमरखेड दि, 30 सोमवार रोजी कॉलेज करून घराकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने 19 वर्षीय युवक जागेवरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दिनांक 30 रोजी दुपारी 1:45 दरम्यान बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळील ही घटना घडली.
अपघातात मृत्यू झालेल्या मूर्तकाचे नाव अजित गजानन राठोड रा.कृष्णापुर तांडा, ता, उमरखेडअसे असून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक, Mh 29, c g 3519 हा असून दुपारी कॉलेजवरून घराकडे जात असताना मागून येणाऱ्या MH 48 T 5580 या टिप्परने जोरदार धडक दिल्याने बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळ अजित राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. अजित राठोड हा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय इयत्ता 11 वी मध्ये शिकत होता सदर अपघाताचे फिर्याद मूर्तकाचे वडील गजानन गोकुळ राठोड वय 40 वर्ष यांनी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. असून वाहन चालकावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे सदर अपघातामुळे संपूर्ण गावावर शोकाकुल पसरली आहे.
Discussion about this post