प्रशांत टेके पाटील ( तालुका प्रतिनिधी कोपरगाव) —
कोपरगांव येथील प्रसिध्द भूलतज्ज्ञ, मा.श्री. डॉ. सुभाष दामोदर मुंदडा यांचा ७५ वा. अभिष्टचिंतन सोहळा काल, रविवार दिनांक २९/१२/२०२४ रोजी, साई सिटी, कोपरगांव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विवेक कोल्हे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून आदरणीय श्री.डॉ.सुभाष दामोदर मुंदडा यांना शुभेच्छा देऊन आशिर्वाद घेतले.
७५ वी, गाठणे हा आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णक्षण असतो. या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेल्या अनेक वर्षांपासून मुंदडा परिवार सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रात सदैव अग्रेसर आहे, तसेच कोल्हे परिवाराशी अनेक वर्षांपासून त्यांचा स्नेह आहे.
डॉक्टर साहेबांना कोल्हे परिवार वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचे पुढील आयुष्य निरोगी, सुखाचे समाधानाचे, समृद्धीचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो असे मनोगत या शुभ प्रसंगी व्यक्त केले!
या वेळी, पीपल्स बँकेचे चेअरमन मा.श्री. सत्यमजी मुंदडा, मा.श्री. काकाजी कोयटे, मा.श्री.कैलासजी ठोळे, मा.श्री.डॉ.रामदासजी आव्हाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post