भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
अहमदाबाद-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ३० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी महालक्ष्मी (विवळवेढे) ब्रिजवर दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या टँकरने समोरील ट्रेलरला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे टँकरचा चालक गंभीर जखमी झाला असून, तो केबिनमध्ये अडकून पडला होता.
अपघातात ट्रेलरवरील पाईप रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी त्वरित कासा पोलीस दाखल झाले आणि टँकर चालकाला बाहेर काढून तातडीने कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. पोलीसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करून काही वेळातच महामार्गावरची वाहतूक सुरू केली.
अपघाताच्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
Discussion about this post