

अझहर पठाण..
शहर प्रतिनिधी कळंब..
कळंब : आज कळंब शहरातील स्व. गणपतरावजी कथले युवक आघाडीच्या वतीने बुधवार दि. ०१ जानेवारी २०२५ रोजी कळंब मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. नूतन वर्षाच्या पहील्याच दिवसाची आरोग्यदायी सुरुवात व्हावी, सामाजिक ऐक्य अधिक बळकट व्हावे व नव्या-जुन्या पिढीत शरीर संपदेच्या दृष्टीने व्यायामाची जोपासना व्हावी या उद्देशाने ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. नगर परीषद शाळा क. १ पासुन सकाळी ६ वा. मॅरेथॉनला सुरुवात होणार असुन, डिकसळ येथील कॅम्ब्रीज इंग्लीश स्कूलपर्यंत कळंबकर या स्पर्धेत धावणार आहेत. सदर मॅरेथॉन स्पर्धा गट क्रमांक एक मुली प्रथम पारितोषिक 2025 द्वितीय पारितोषिक 1025 तृतीय पारितोषिक 525 गट क्रमांक एक मुले प्रथम पारितोषिक 2025 द्वितीय पारितोषिक 1025 तृतीय पारितोषिक 525 खुला गट प्रथम पारितोषिक 4025 द्वितीय पारितोषिक 2025 तृतीय पारितोषिक 1025 खुला गट महिला प्रथम पारितोषिक 425 द्वितीय पारितोषिक 2025 गट क्रमांक तीन वय 4025 वर्ष पुढील प्रथम सन्मान चिन्ह द्वितीय सन्मानचिन्ह तृतीय सन्मानचिन्ह बक्षीस व सन्मानचिन्ह सौजन्य डॉक्टर प्रताप सिंह विथ प्रकाश पाटील..
Discussion about this post