प्रतिनिधि गणेश वाडेकर
30/12/2024
पातूर शहरालगत असलेल्या भंडारज येथे शेतीच्या धुऱ्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान कोयत्याने हल्ला करण्यापर्यंत गेले. या हल्ल्यात एक जण जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. सुरेश बगळेकर रा. शिवाजीनगर, शनिवारपुरा, पातूर व ऋतिक शिवहरी परमाळे रा. बाळापूर वेस्ट, पातूर यांच्यात शेतीच्या धुऱ्यावरून बाचाबाची झाली. सदर वाद विकोपास गेल्याने रागाच्या भरात ऋतिक परमाळे याने सुरेश बगळेकर (५५) यांच्या पाठीवर कोयत्याचा जबरदस्त वार करून गंभीर जखमी केले.
Discussion about this post