मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा: जिल्हा वाशिम येथील रेल्वे स्टेशनला सोमा डोमा आंध असे नामकरण शासनाकडून मंजूर झाले आहे. परंतु अद्याप पर्यंत वरील नाव अमलात आणलेले नाही.
तेव्हा वाशिम जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी वरील नामकरणांचा बऱ्याच वेळा पाठपुरावा संबंधिताकडे केलेला आहे.
आज पुन्हा दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी वाशिम यवतमाळ मतदार संघाचे खासदार संजय देशमुख, तथा वाशिम जिल्ह्याचे नगरपरिषदेचे सिओ यांच्याशी समाज बांधवांनी चर्चा करून वरील नामकरणा विषयी निवेदन दिले आहे.
सदर वाशिम रेल्वे स्टेशनला सोमा डोमा आंध हे नाव शासनाकडून मंजुरात आलेले आहे परंतु हे नाव अद्याप पर्यंतही रेल्वे स्टेशनला देण्यात का आले नाही. याचा पाठपुरा मात्र आदिवासी कार्यकर्ते वारंवार करीत आहे.
तर खासदार देशमुख यांच्याकडे निवेदनही दिले आणि निवेदनासोबत मंजुराचे दस्तऐवज सुद्धा जोडलेले आहे.
त्याचबरोबर दुसरी मागणी अशी की काटा रोड वाशिम चौकाला देशाचे आद्य क्रांतिकारक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा हे नाव देवून या चौकाचे सौंदर्यकरण करण्यात यावे.
अशाप्रकारे इतरही मागण्या निवेदनातून आदिवासी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आल्या आहे.
निवेदनावर खालील सह्या डॉ. एम.बी. डाखोरे माजी नियोजन अधिकारी, बाबाराव गोदमले सा. कार्यकर्ते, रामदास मुखाडे, नारायण काळे, नाजूकराव भोंडणे, काशिनाथ बोके, आनंद खुळे, विजय भोरकडे, गजानन ढोके, मारोती पारधी, गजानन गिऱ्हे, ई आहेत.
Discussion about this post