मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालकांत चर्चा
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : तालुक्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून कार्यरत असलेले डॉ.संजय रोठे यांना ठरवून दिल्याप्रमाणे दोन वर्षाचा कालावधी संपत असून आता कोण सभापती होणार अशी चर्चा तालुक्यातील राजकीय वातावरण होत असून संचालक मंडळात होताना दिसून येत आहे तर संचालकांपैकी कुणाच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडणार ह्या संदर्भात संचालक, शेतकरी व नागरिकांमध्ये आता चर्चा व्हायला लागल्या आहेत.
मागील दोन वर्षांपूर्वी बाजार समितीची निवडणूक पार पडली त्यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे आणि राज्याचे माजी विज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या निवडणूक पार पडल्यानंतर ह्यांना विजय हा मोठ्या फरकाने झाला त्यावेळी सभापती पदाची रस्सीखेच होणार हे हेरून जेष्ठ नेत्यांनी दोन वर्षाकरिता सभापती पदावर संचालकांमधून आणि निवडून आलेल्या प्रतिनिधीला सभापती पदाचा कार्यकाळ उपभोगता येईल असे ठरविले गेल्याच्या चर्चा आहेत. परंतु आता दोन वर्षे लोटली उलटून गेली तरी पण सभापती पदाची निवडणूक लागली नसल्याने संचालक मंडळात एकच चर्चा सुरू आहे. सभापती केव्हा बदलणार आणि नवीन सभापती पदाची धुरा कोण सांभाळणार अशी चर्चा होत आहे.
विद्यमान सभापती ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा देऊन निवडून आलेल्या इतर संचालकांना वाट मोकळी करून देतात की सभापती पद सोडण्यासाठी आढेवेढे घेतात हे सुद्धा पाहणे रंजक ठरणार असल्याचे यानिमित्ताने बोलले जात आहे.
Discussion about this post