मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : नाफेडच्या सोयाबीन खरेदीत शेतकऱ्यांची प्रति क्विंटल २ किलो कट्टी व हमाली च्या नावाने भोयनी येथील खरेदी केंद्रावर सुरू असलेली लूट तात्काळ थांबवून. सोयाबीन खरेदी सुरू केल्यापासून आजपर्यंत झालेल्या खरेदीची चौकशी करून तेथील ग्रेडर व संबंधित खरीदारावर कार्यवाही करण्याची मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी स्थानिक तहसीलदार यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे
याबाबत दिलेल्या निवेदन आसमानी संकटाचा सामना करीत पिकविलेल्या शेती पिकाला व्यापारी
धार्जिन्या शासनाच्या धोरणा पाई शेतकऱ्याला दिवसा ढवळ्या लुटण्याचा प्रकार मानोरा तालुक्यातील भोयनी येथे नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्रावर प्रतिक्विंटल २ किलो प्रमाणे कट्टी घेऊन हमालीचे दर लावून शेतकऱ्याची लूट चालू आहे.
प्रतिदिन हजारो क्विंटल सोयाबीन भोयनी येथे खरेदी केली जात असून दोन किलो कट्टी चा हिशोब केला तर लाखो रुपयाचा गंडा शेतकऱ्याच्या नावावर घालण्यात जात आहे.तेव्हा हा प्रकार दिवसा शेतकऱ्यांना लुटण्याचा आहे. ते तात्काळ थांबून या प्रकरणाची चौकशी होने गरजेचे असल्याचे राठोड यांनी निवेदन म्हटले आहे.रात्र रात्र जागून काढलेला पीक कवडीमोल भावाने विक्री करावी लागत असतानाच शासनाच्या नाफेड सारख्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मालाच्या वजन मापात कट्टीच्या नावाने लूट चालू असून याबाबत एखाद्या शेतकऱ्याने विचारना केली असता त्या शेतकऱ्याची दमदाटी करून तुमची सोयाबीन खराब आहे, हे माल नाफेड मध्ये चालत नाही असे उत्तरे देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक केल्या जात आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर हे कारनामे चालू असताना एका शेतकऱ्याने ग्रेडरला याबाबत विचारले असता त्यांनी त्या शेतकऱ्याला दमदाटी केल्याची आपबिती त्या शेतकऱ्यांनी आमच्यासमोर व्यथा मांडली. दररोज असे शेकडो शेतकऱ्यांची येथे लूट होण्याची शक्यता असून संकटग्रस्त शेतकरी अशा उर्मट व दंडूकेशाहीचा वापर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कित्येक शेतकरी बळी पडले असेल तेव्हा ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची झालेली खरेदी व वजन काटापट्टी यांची चौकशी करून आज पर्यंत सोयाबीन खरेदी झालेल्या कळाबाजाराची सखोल चौकशी करून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा.सहाय्यक निबंधक मानोरा व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन राठोड यांनी चौकशीची मागणी केली आहे
Discussion about this post