*सावनेर – सूर्यकांत तळखंडे
2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे अनुदान एक हेक्टर 5000 प्रमाणे शासनाने शेतकऱ्यांना देय कबूल केलेले आहे.या करिता के.वाय.सी करा बँक खात्याशी आधार लिंक करा खाते अपडेट करा? या प्रमाणे संबंधीत कृषी अधिकारी यांच्या मार्फत शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आला.
सावनेर तालुक्यातील मंगसा, परसोडी,खाणगाव, खुरजगाव व इतर सर्व गावामध्ये 2023 ला अतिवृष्टी झाल्याने बळीराज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.सावनेर तालुका कृषी अधिकारी महसूल विभाग यांच्या मार्फत पंचनामे करून शासनाला अहवाल पाठविण्यात आला.व शेतकऱ्यांना तातडीने मदत करू असी हमी पण कृषी अधिकारी व महसूल विभागानी दिली. परंतु ज्या वर्षीचे अनुदान त्याचं वर्षी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे.एक वर्ष लोटले तरीपण अनुदान अजूनपरेंत जमा झालेले नाही. त्यातच शासनाने ई केवायशी करण्याची अट ठेवण्यात आली पण प्रत्येक वर्षी ई केवायशी कशाला हा प्रश्न शेतकरी शासनाला विचारत आहे तरी पण शेतकऱ्यांनी ई केवायशी करून सुद्धा 6 महिन्याचा काळ लोटून गेला तरी खाते रिकामेच आहे या बाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रक्कम जमा होईल थोडा वेळ लागेल असे उत्तर शेतकऱ्यांना मिळत आहे शासनाने व जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष द्यावे जेणेकरून अनुदानाची रक्कम लवकर जमा होईल असी मागणी सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
Discussion about this post