सोयगाव :
उपक्रमशील शाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तसेच बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डिंपल ठोंबरे, मनीषा दांडगे, राधिका काकफाळे, तनुश्री इंगळे, किरण जेठे, अनन्या पगारे,मानसी कळवत्रे,इशिका आगे,मोहिनी जाधव, पायल कऱ्हाळे, शितल इंगळे या विद्यार्थीनी नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची सुंदर अशी वेशभुषा परीधान केली तर डिंपल ठोंबरे, किरण जेठे, तनुश्री इंगळे, रितेश सुरडकर, फरहान शेख, जय इंगळे, वैभव इंगळे, आदेश जेठे या विद्यार्थी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबतची माहीती भाषणामधून विद्यार्थ्याना दिली.
यावेळी राजू कुडके, योगेश बोखारे, शिवाजी गोढरे,कोमल आगे,मनिषा जेठे,संध्या पगारे,वैशाली इंगळे , मुख्याध्यापक किरण पाटील, सहशिक्षक गोपाल चौधरी, प्रशिक्षित शिक्षक शुभम देसले, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ : सोयगाव रामजी नगर जिल्हा परीषद प्राथमिक शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त अभिवादन करतांना मान्यवर
Discussion about this post