विधानसभेच्या निवडणूक होऊन एक महिन्यांचा काळ उलटला सरकारही स्थापन झाले मंत्रिपदांचे वाटपही झाले मात्र अद्याप पालकमंत्र्यांची लिस्ट जाहीर न झाल्याने सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत चांगलीच उत्सुकता शिगेला पोचली आहे. सांगली जिल्ह्यातील जनतेने यंदा महायुतीला भरभरून मते देत चार आमदार निवडून दिले मात्र मंत्री पदाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री मिळणार हे निश्चित मानले जातेय. मात्र अद्यापही पालकमंत्री पदाची लिस्ट जाहीर झाली नसल्याने जिल्ह्याचा पालक भाजप कि राष्ट्रवादी (अजित पवार गट) याबाबत संभ्रम कायम आहे कि आणखी राजकीय भूकंपाची शक्यता आहे अशी कुजबुज जनतेमधून सुरु आहे. अजूनही एक मंत्रिपद राखून ठेवले गेल्याने भविष्यात जिल्ह्यामध्ये आणखी काही राजकीय भूकंपाची शक्यता होईल काय याबाबत चर्चाना ऊत आला आहे. सध्या तरी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. यापूर्वीही त्यांनी सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचे काम केले आहे. तर शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ यांच्याही नावाची चर्चा पाल्कमंत्रीपदासाठी सुरु आहे. मात्र सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ हि भाजप च्या गळ्यात पडावी यासाठी भाजप नेते आग्रही असल्याचे समजते. यंदा मात्र चार आमदार निवडून येऊन हि मंत्रिपदाचा ठेंगा दाखवला गेला. मात्र आघाडीच्या काळामध्ये सांगली जिल्ह्याला स्व आर आर पाटील, आम जयंत पाटील आणि स्व डॉ पतंगराव कदम यांच्या रूपाने तीन मंत्रीपदे मिळाली असल्याचे दाखले सर्वत्र देताना दिसून येत आहेत. तत्कालीन डॉ पतंगराव कदम यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचे काम दमदार पार पाडले तसेच आम जयंत पाटील हेही जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली होती. पालकमंत्री पद हे जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. जिल्हा नियोजन समतेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पालकमंत्री काम पहात असतात तसेच सरकार दरबारी विकास कामांसाठी पाठपुरावा करून निधी मिळवण्याचे कामही ते करत असतात.
Discussion about this post