बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगा येथील सरपंच संतोष देशमुख यांची निघॄ॔न हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र भर आंदोलने , मोर्चा काढण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी मोड येथे सकाळी ११ वाजता तालुक्यातील आम्ही सर्व सरपंच, उपसरपंच सामाजिक संघटना सह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले . फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध घ्यावा.व सरपंच संतोष देशमुख यांच्या कूटूंबास ५० लाखांची तात्काळ मदत द्यावी. सरपंचा मधून दोन ते तिन आमदार विधानसभेवर पाठवावे.
जेने करून सरपंचाचे प्रश्न विधानसभेत मांडता येथिल. नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सरपंचांना मतदानाचा अधिकार द्यावा, सरपंचांना संरक्षण द्यावे अशा अनेक प्रकारच्या मागण्या मागण्यात आल्या. याप्रसंगी आनंदवाडी चे सरपंच भागवत वंगे, जोगाळाचे सरपंच इंद्रजित माने, शिवपूरचे दिलीप पाटील, हिसामाबाद संजिव बिराजदार,कळमगाव बापू शिंदे ,आरीचे उपसरपंच नारायण पवार, रापका ज्ञानेश्वर पाटील, सय्यद अंकूलग्याचे मिर्जा माजित, तूरूकवाडीचे उपसरपंच वाभ भाई शेख, उपसरपंच व्यंकट कल्ले, बळवंत शिरूरे, गोविंद श्रीमंगल, सरोजताई गायकवाड, भरत ढगे, राहूल काकडे आदी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post