भेलके महाविद्यालयात भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या वेळी प्राचार्य डॉ तुषार शितोळे यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्यावर भाष्य करताना त्यांच्या शिक्षण व महिलांच्या अधिकारासाठी केलेल्या योगदानाचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त करताना सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला.
या प्रसंगी प्रा.डॉ जगदीश शेवते, प्रा. जीवन गायकवाड, प्रा. डॉ. सचिन घाडगे, प्रा. प्रल्हाद ननावरे, प्रा पोमन कोमल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संदीप लांडगे यांनी केले. यावेळी प्रा . भगवान गावीत, प्रा.जाधवर दयानंद, प्रा. माऊली कोंडे, प्रा. ऐश्वर्या धुमाळ, प्रा अंकिता महांगरे, प्रा.भूषण समगीर, कार्यालय प्रमुख श्री.विकास ताकवले महाविद्यालयातील सर्व कर्मचारी, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post