मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत तळप येथे दि. १ जानेवारीला स्वच्छता अभियान वाघा माय मरीमाय मुंगसाजी महाराज देवस्थान तर्फे नवीन वर्षा निमित्त पालखीचे नियोजन करण्यात आले गावात पालखी भ्रमन करुन नववर्षा निमित्त मोहीमेला सुरुवात झाली आहे. या स्वच्छता सामुहिक अभियान मोहीमेत हातात झाडू घेऊन सहभाग नोंदविला.
नुतन वर्षानिमीत्त गावातील तसेच गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता राहावी, म्हणून गावातील सर्व पुरुष व महीला भगिनींना या सामुहिक स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी करून घेत गाव व परिसर स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली आहे. या स्वच्छता अभियानात स्वतःहून गावकरी मंडळी सहभागी होत आहेत. नवीन वर्षदिनी प्रतिष्ठीत नागरीक गावातील नागरिकांनी सामुहिक स्वच्छता अभियान मोहिमेत सहभाग घेतला होता.
Discussion about this post