दिनांक – 03.01.2025सोलापूर जिल्हा प्रतिनिधी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंदरगाव तालुका माढा येथे आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेश्माताई मोहन नाईकवाडे यांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका व
समाज सेविका होत्या किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साख्या लेकिनी गिरवले प्रमुख पाहुण्या म्हणून जेष्ठ माता कुमुदिनी भीमराव चव्हाण या उपस्थित होत्या.दिवसभरात विद्यार्थिनींच्या वेशभूषा, वक्तृत्व, रंगभरण ,धावणे,
चमचा लिंबू, फनी गेम स्पर्धा चुरशीने खेळेमिळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. बक्षीस विजेते विद्यार्थिनी पुढील प्रमाणे ..*वेशभूषा* तनवी समाधान आरे, स्वरा विष्णू सुतार, स्वरांजली अभिमान नाईकवाडे *वक्तृत्व* आसावरी सचिन चव्हाण, शर्वरी किशोर जाधव, अंकिता सयाजी नाईकवाडे *लिंबू चमचा* कार्तिकी दिनेश मस्के, स्वराली पांडुरंग मस्के, स्वरा वैभव मस्के,आरोही अजित घाडगे *धावणे* शैलजा आनंद लटके,
अनुष्का ज्ञानेश्वर मस्के, ईश्वरी सुभाष नाईकवाडे, आरोही अजित घाडगे *फनी गेम* आरोही बापूराव मोटे, स्वरा विष्णू उकिरडे, स्वरा वैभव मस्के ज्ञानेश्वरी नवनाथ काळभारे वरील स्पर्धा यशस्वीपणे पार करण्यासाठी कुमुदिनी गिड्डे- कापसे मॅडम , बिपिन कदम सर ,
धोंडीराम कांबळे सर,धनराज शिंदे सर यांनी परिश्रम घेतले. शालेय पोषण आहारात सर्वच विद्यार्थ्यांना केळीचे वाटपही करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच सर्व मातांनी बहुमोल सहकार्य केले.
शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांच्या हस्ते प्रत्येक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यास बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.
बालिका दिन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बालाजी नाईकवाडे,दारफळ केंद्राचे केंद्रप्रमुख श्री फारूक शेख सर, गावचे सरपंच राजाभाऊ लवटे, उपसरपंच समाधान मस्के यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले.मोठ्या उत्साहात जयंतीचे आयोजन करण्यात आले
Discussion about this post