हवेली तालुका प्रतिनिधी
कोंढवे धावडे – शहीद महेश जी वांजळे यांच्या स्मरणार्थ कोंढवे धावडे येथे वीर माता पुरस्कार आणि देशभक्त प्रेरणा पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शहीद शशीधरण नायर यांच्या मातोश्री लताताई नायर यांना वीर माता पुरस्काराने जिल्हा परिषद सदस्य सौ अनिता इंगळे श्रीमती रखमाबाई विठोबा वांजळे श्रीमती अरुणा अंकुश वांजळे श्रीमती शैला सोपान वांजळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच देशभक्त प्रेरणा पुरस्काराने कारगिल युद्ध अजयजी थापा यांना कर्नल महादेवजी घुगे आमदार भीमराव अण्णा तापकीर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन अनिल विठोबा वांजळे यांनी केले होते.या कार्यक्रमाला भाजपा नेते उमेश सरपाटील, छावा संघटनेचे प्रवक्ते गणेश राऊत स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट अरुण दांगट सुभाष नाणेकर त्रिंबकअण्णा मोकाशी बबनराव धावडे युवराज वांजळे सुरेशजी धावडे माणिक मोकाशी रमेश धावडे नितीन धावडे भगवानजी गायकवाड अंबादास धर्मकांबळे अतुल वांजळे रमेश वांजळे संतोष वांजळे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.शहीद महेश वांजळे यांच्या स्मरणार्थ जे पुरस्कार दिले गेले त्यांचं कार्य देश हिताचे देशप्रतीच आहे आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ही लोक मोठी आहेत यांच्यामुळे आपला देश सुरक्षित आहे आपण सुरक्षित आहोत खऱ्या अर्थाने त्यांना देशासाठी आपल्या प्राणाची यावती द्यावी लागते आणि ती आहुती महेश जी वांजळे यांनी दिली आणि त्यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जात आहेत ही प्रेरणा युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे मनोगत यावेळी आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बिबीशन मोरे यांनी केले.
Discussion about this post