हवेली तालुका प्रतिनिधी
कै. गुलाबराव तुकाराम वांजळे प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप उर्फ बाबा धुमाळ व शिक्षण विभागाच्या उपप्रशासकीय अधिकारी सौ शुभांगी चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले विभागाच्या पर्यवेक्षिका सौ अनिता रेंगडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक देण्यात आले स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी भारताच्या विविध राज्यांची लोककला, गोंधळ, राज आल, वो किस्ना है, कभी अलविदा ना कहना इ .विविधरंगी, सुंदर नृत्याविष्कार सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना ढमढेरे व पूजा जाधव यांनी केले.सदर कार्यक्रमात अहिरे गावचे ग्रामस्थ दिनकर वांजळे यांनी 68 बी शाळेच्या विद्यार्थ्यांना लेझीम साठी 29 ड्रेस भेट दिले तसेच सेंट मार आवियंस शाळेचे क्रीडा संघटक राजू गमरे व मनपा शाळा क्र. 43 जी इंग्रजी शाळेच्या शिक्षिका आरती गमरे या दांपत्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी 12 टी-शर्ट भेट दिले. या स्नेहसंमेलनास सचिन दांगट , राजीव पाटील, किरण वांजळे तसेच वारजे विभागातील सर्व मुख्याध्यापक यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.68 B शाळेच्या मुख्याध्यापिका निशा बेंगळे आणि 148 B शाळेच्या मुख्याध्यापिका माणिक गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. पालकांनी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात भाग घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराचे सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका निशा बेंगळे यांच्या नोकरीतील हे शेवटचे स्नेहसंमेलन असल्याने कभी अलविदा ना कहना या सादरीकरणाने सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले.
Discussion about this post