आजरा: प्रतिनिधी,
व्यंकटराव हायस्कूल मध्ये महिलांच्यात शिक्षणाची ज्योत पेटवणारी भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका आजीवन आपल्या पतीचे सामाजिक कार्य आपल्या खांद्यावर वाहून नेणारी व साहित्यातील रत्न क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
याप्रसंगी आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा या संस्थेचे सचिव मा श्री अभिषेक शिंपी व मा श्री सचिन शिंपी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी संचालक श्री विलास पाटील प्राचार्य श्री आर जी कुंभार पर्यवेक्षिका सौ व्ही.जे शेलार यांनीही प्रतिमेस पुष्प वाहिले.. प्रशालेलीतील इयत्ता पहिली ते सीनियर कॉलेज मधील सर्व शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री व्ही टी कांबळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याबद्दल आपले विचार मांडताना सांगितले की, महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात त्यांनी तत्कालीन जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात नव्यांचा संप घडवून आणला होता. सावित्रीबाई यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले. इसवी सन 1897 मध्ये प्लेगची साथ आली होती. त्यावेळेस त्यांनी लोकांसाठी काम केले. शेवटी प्लेगची लागण होऊन 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा समाजसेवी , कर्तृत्ववान सावित्रीबाईंचे जीवन कार्यच त्यांनी मांडले .
इयत्ता सातवी अ, ब ,क या वर्गातील विद्यार्थ्यांनी व श्री डी आर पाटील यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यशराज पोतदार व श्रावणी कातकर या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती या दोन्ही विद्यार्थ्यांचे कौतुक झाले. आर्या प्रभू, आर्या पाटील ,जो जो यादव ,शुक्राणी दोरुगडे ,स्नेहल सावरतकर या विद्यार्थ्यांनी कविता ,ओवी व भाषणातून आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी देसाई व कादंबरी धुरी यांनी केले आभार संस्कृत विषय शिक्षिका सौ एस डी ईलगे यांनी मानले.
Discussion about this post