चंदगड :
नव वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकजण वेगवेगळे संकल्प करत असतात आणि ते साकार करण्यासाठी प्रयत्न करत असतात . शालेय विद्यार्थी नेहमी असे संकल्प करून ते पुर्णत्वास नेतात . दि न्यू इंग्लिश स्कूल मधील इ . नववी च्या विद्यार्थ्यांनी नववर्षांच्या निमित्ताने विद्यालयाला ३३ फुलांच्या कुंड्या प्राचार्य एन . एन . देवळे यांच्या कडे सुपूर्त केल्या. व नवीन वर्षाचा पर्यावरण वाचवा चा संदेश दिला . विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षक संजय साबळे यांचे मार्गदर्शन लाभले .
यावेळी ज्येष्ठ अध्यापक टी .एस .चांदेकर , एम . व्ही. कानूरकर , टी .टी बेरडे , बी . आर चिगरे , डी .जी पाटील , जे .जी पाटील , एस जी साबळे , शरद हदगल , वर्षा पाटील विद्या डोंगरे उपस्थित होते .
Discussion about this post