
चिमूर :- दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला ग्रामगीता महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून महाविद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शशिकांत आस्वले, डॉ. हुमेश्वर आनंदे, डॉ. संदीप सातव आणि डॉ. निलेश ठवकर उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनातून खूप काही अंगीकार करण्यायोग्य आहे असे मत व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनियुक्त प्राचार्य डॉ. सुनंदा एस. आस्वले यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. बिजनकुमार शील, प्रास्ताविक डॉ. सुमेध वावरे तसेच आभार प्रदर्शन डॉ. युवराज बोधे यांनी केले. कार्यक्रमात बहुसंख्येने विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post