
अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले..
गणेश राठोड..
तालुका प्रतिनिधी उमरखेड..
उमरखेड :-
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव रोडवर असलेल्या घनकचरा संकलन डेपोला आज दुपारी 12:30 वाजता चे सुमारास अचानक आग लागल्याने राष्ट्रीय महामार्ग धुराने अक्षरशः काळवंडून गेला होता .संकलन केंद्राच्या पश्चिमेकडील गोरोबा नगर चरडे नगर पाटील नगर या परिसरात धुराचे लोळ पसरल्याने परिसर काळवंडून गेला होता .सुमारे दोन तासापर्यंत धुरामुळे परिसरातील नागरिक व राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास करणारी वाहने धोकादायक परिस्थितीतून वाटचाल करीत होते .कचरा संकलन डेपोच्या सुपरवायझरने नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला तात्काळ कळविल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले परंतु कचऱ्याच्या व घाणीच्या प्रदूषण युक्त धुराने नागरिक त्रस्त झाले होते .गावातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांमध्ये कुण्यातरी नागरिकांने कचऱ्यामध्ये विस्तव टाकला असावा त्यामुळे सदर आग लागली असावी असा अंदाज संबंधित कचरा संकलन डेपोच्या सुपरवायझरने व्यक्त केला .अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले असले तरीही धुरांच्या लोळ उशिरापर्यंत होते त्यामुळे नागरिक श्वसनाचा त्रासाने त्रस्त झाले होते .राष्ट्रीय महामार्ग काळवंडून गेल्याने वाहनांनाही बिकट बिकट परिस्थितीत वाहने काढत होते .सुदैवाने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही .
" चौकट "
नागपूर तुळजापूर महामार्गावर महागाव रोडच्या पूर्वेकडून कडेला असणारा घनकचरा संकलन डेपो हा नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याने सदर डेपो हा गावाबाहेर हलविण्यात यावा .अशा प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिले आहेत…
Discussion about this post