सध्या सांगली मिरजेत सुरु असलेल्या कृत्रिम मुद्रांक टंचाई करून जादा दराने मुद्रांक विक्री केल्याची प्रकरणे समोर येत आहेत यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी सह जिल्हा निबंधक वर्ग १ मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे जिरंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या कि कोणत्याही मुद्रांक विक्रेत्याने कृत्रिम टंचाई भासवून जादा दराने मुद्रांक विक्री करू नये तसे आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करू. तसेच त्या पुढे म्हणाल्या १ जुलै २००४ च्या आदेशानुसार महसूल व वन विभाग यांच्या परिपत्रकात जात उत्पन्न वास्तव्य तसेच राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शासकीय कार्यालये आणि इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञा पत्रावर मुद्रांक शुल्क माफ केले आहे तशा सूचनाही आस्थापना ना दिल्या आहेत कोणत्याही न्यायप्रक्रियेत न्यायालयासमोरील प्रतिज्ञापत्रावर मुद्रांकाची आवश्यकता नाही. तसेच जिल्ह्यामध्ये कोठेही मुद्रांकाची टंचाई नाहीये. आणि मुद्रांक विक्रेत्यांनी त्यांच्याकडे १०० आणि २०० रु चे मुद्रांक उपलब्ध असतील तर त्यांचा पुरवठा मागणीनुसार केला पाहिजे मात्र शासनाच्या १४ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशानुसार आता या मुद्रांका ऐवजी ५०० रु चा मुद्रांकाचा पक्षकारांनी वापर करावा यावेळी नमूद केले.
Discussion about this post