
प्रतिनिधी पांडुरंग गाडे..
संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये अभंग प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या सेवाभावी वाटचालीस आज 21 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने मुख्य मंदिरामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी चा अभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभंग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.
अभंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व सदस्य अतिशय निरपक्षपणे हे सर्व कार्य अखंडितपणे सुरू ठेवले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले जाते तसेच गोरगरीब जनतेला प्रतिष्ठानच्या माध्यमातून मदत करण्याचं काम केलं जातं.
दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी अभंग प्रतिष्ठानला 21 वर्षे पूर्ण होत आहे आणि त्या निमित्ताने सन 2025 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अभंग प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी श्री सुरेश लक्ष्मण गाडे. यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी श्री. गणेश विलास साळुंखे, सचिव पदी श्री .अजिंक्य चंद्रकांत साकोरे व खजिनदारपदी श्री .अनिल पांडुरंग गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post