प्रतिनिधी:- योगेश जऱ्हाड
राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पीएम श्री जि प प्रशाला पानवडोद ने शिक्षण महोत्सवाचे आयोजन केले असून यात संस्कृतिक हॉल मध्ये जागतिक कीर्तीचे चित्रकार गजेंद्र आव्हारे आणि साईनाथ फूसे व विजयानंद काळे सर यांच्या अप्रतिम चित्राचे दोन दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. अनिलजी साबळे अध्यक्ष विभागीय मध्य व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. यात प्रशालेच्या विद्यार्थ्यांसह केंद्रांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा, प्रां शाळा पानवडोद खुर्द ,प्रां.शा इजलापूरवाडी येथील विदयार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्याचा लाभ घेतला. दुसर्या दिवशी जेष्ठ शिक्षक भास्कर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय अध्यक्ष पांडुरंग दौड, अनिल खरात, विजय वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रकला प्रदर्शन समारोप सोहोळा संपन्न झाला. या प्रसंगी चित्रकार गजेंद्र आव्हारे, साईनाथ फूसे, शिक्षक निशिगंधा दलाल, डी. के सपकाळ यांनी चित्रकला एक कला आहे ती प्रत्येकाला करियर च्या दृष्टीकोनातून विकसित करता येते. अश्या आशयाचे मार्गदर्शन केले. चित्रकला प्रदर्शन यशस्वीतेसाठी इसील तडवी , चित्रकला शिक्षक कमलाकर गोफने, अमोल कालभिले, बिपीन नाडर, भारती मानकर, शहाबुद्दीन शेख, रामेश्वर बसैये श्रीमती दिपाली सपकाळ, दिव्या बीरारे , बारोटे मॅडम, पंकज पवार योगेश सिनकर यानी सहकार्य केले. प्रास्ताविक विजया चापे यांनी केले तर आभार जमील शेख यांनी मानले.
Discussion about this post