यवतमाळ: प्रतिनिधी:- देवानंद आत्राम
कळंब शहरात भरदिवसा घरफोडीचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील सहा दिवसात चार घरफोड्यांच्या प्रकार उघडीस आला. अवधूत नगरीत घरफोडीची घटना घडली. अरविंद महादेव सातपुते यांच्या घरी ही चोरी झाली. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दोन टोळे सोन्याची पोत,सोन्याच्या तीन अंगठ्या आणि रोख तीस हजार रुपये,असा तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. मागील काही दिवसात झालेल्या येकाही चोरीचा शोध लावण्यात कळंब पोलिसांना यश आलेला नाही.
Discussion about this post