🏻✍🏻 मनोज चौधरी ✍🏻✍🏻
नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायत कार्यालय येथे आज मराठी पत्रकारितेचे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस खांडबारा गावाचे प्रथम लोक नियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश गावित यांच्या हस्ते नारळ फोडून प्रतिमा पूजन करण्यात आले.
तसेच मान्यवरांच्या हस्ते देखील प्रतिमा पूजन करण्यात आले.
यावेळी सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना पेन भेट म्हणून देण्यात आली
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जगदीश चौधरी सामाजिक कार्यकर्ते हरेश चौधरी, गणपती मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अनिल शर्मा, सचिव शरीफ बागवान, दिलीप पाटील, मोहन शिंदे, भटु पवार,विलास गव्हाणे, विजय रामराजे, संतोष रामराजे, तसेच पत्रकार संघाचे अध्यक्ष आर बी वाघ, उपाध्यक्ष मनोज चौधरी, प्रसिद्धी प्रमुख सुनील भामरे, पुरुषोत्तम अहिरराव, शशिकांत शिंदे, आदी उपस्थित होते.


Discussion about this post