{डेंगूची अनामिक भीती}
••आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज••
धर्माबाद तालुका प्रतिनिधी चैतन्य घाटे…
- धर्माबाद शहरासह तालुक्यातील जवळपास सर्वच गावात डासांचा नुसता प्रकोप निर्माण झाला असून त्यामुळे डेंगू सदृष्य आजारांची अनामिक भीती सर्व नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यामुळे नगरपालिका प्रशासनासह आरोग्य विभागानेही वेळीच लक्ष देण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शहरासह तालुक्यात डासांचा नुसता उच्छाद वाढल्याने अनेकांना रात्रीच्या वेळेस लाईट नसताना डासांचा बंदोबस्त कसा करावा असा प्रश्न पडल्यामुळे त्यांची निद्रानाश होत आहे.
शहरातील खोदकामामुळे जागोजागी खड्डे पडल्यामुळे पाणी साचून डासाची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे. यामध्ये जखमेवर मीठ चोळण्या सारखाच प्रकार म्हणजे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे हा असून आता ह्या वेदना असह्य होत आहेत.
उपरोक्त पार्श्वभूमीवर डेंगू ,चिकनगुनिया, यासह हत्तीपाय रोगांना निमंत्रण मिळण्याची शक्यता असून महाराष्ट्र शासनाचा हत्तीपाय रोग नियंत्रण विभाग आता असून नसल्यातच असल्याचे चित्र असून कर्मचारी फुकट पगार उचलत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. म्हणून सदरील गोष्टीचा नगरपालिका प्रशासनासह तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेनेही विचार करून डासांचा बंदोबस्त करण्याची मागणी शहरासह तालुक्यात होत आहे.
Discussion about this post