अकोला विभाग प्रतिनिधि गणेश वाडेकर
06/01/2025
अकोला:
खदान पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली. घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली. पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. अविनाश श्रीकृष्ण लाहोळे असे आरोपीचे नाव आहे. हा युवक मुलीचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता.
Discussion about this post