प्रतिनिधी:- नित्यानंद मोरे
दिनांक सहा जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांच्या उपस्थितीत , वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते आणि कार्यकर्त्यांनी महाबळेश्वर तहसीलदार यांची भेट घेऊन दि वाल्मिकी बॅकवर्ड क्लास हाऊसिंग सोसायटी चे सेक्रेटरी रोहित मोरे यांनी स्वतःच्या पदाचा गैरवापर करत स्वतःचा प्लॉट मालकी पंधरा असताना समोरील 21 नंबरच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता राजरोसपणे बेकायदेशीर व अनधिकृत आरसीसी बांधकाम सुरू केले आहे. तसेच प्लॉट नंबर 15 मध्ये देखील परवानगी शिवाय जास्त क्षेत्रावर ते मोठ्या प्रमाणावर बांधकाम करत आहेत. तरही हे बांधकाम तात्काळ थांबवून अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे पाचगणी मुख्याधिकारी व महाबळेश्वर तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर लवकरात लवकर अंमलबजावणी न झाल्यास सदर बांधकाम न थांबवल्यास आंदोलन पवित्रा घेऊ असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आला आहे.



Discussion about this post