समाज प्रबोधनाचे मनी विचार, परखड शब्दांनी करूनी प्रहार,
हाती लेखनी नजर सभोवार,
असे असतात धाडसी पत्रकार…
दिनांक 06.01.2025
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
जि . प. प्राथमिक शाळा जाधववाडी ता माढा येथे आज 06.01.2025 रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक व आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकार दिन तसेच जागतिक युद्ध अनाथ दिवसा निमित्ताने मानव सुरक्षा सेवा समिती महाराष्ट्र राज्य माढा तालुका महिला टिम आणि पुरुष टिम च्या वतीने आणि जि. प. प्राथमिक शाळा जाधववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनाही अभ्साबरोबर कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून चित्र कला स्पर्धा आयोजित करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार विजेते सोपान चंद्रकांत चव्हाण पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला. कायदेशीर सल्लागार अॉ. गणेश मोहन चव्हाण याचा सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ केला
चित्र कला स्पर्धा मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कागद आणि रंगीत पेन्सिल दिल्या विद्यार्थीनी निसर्ग चित्र, फुले, प्राणी चित्र काढली
डावरे मॅडम यांनी बाळशास्त्री जांभेकर याचा जन्म 6 जानेवारी 1812पोथुलै ता देवगड येथे झाला मराठीतील पहिले दर्पण वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी लिहिले. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माध्यम पत्रकारिता
प्रमुख पाहुणे समाज भूषण पुरस्कार विजेते सोपान चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले पत्रकाराची समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि आपले काम चोखपणे करण्यासाठी अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो. तरी देखील आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत सामान्य जनतेपर्यंत निर्भीड पणे माहिती मांडता. बेटी बचाओ , बेटी पाढाओ या विषयी माहिती दिली .
तसेच सरपंच श्री .राहुल अंगद जाधव यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केल्या . यावेळी श्री गणेश चव्हाण , अंगद जाधव , अध्यक्ष पांडूरंग पवार , सदस्य देवा जाधव , वैशाली जाधव , वैष्णवी उबाळे तसेच मुख्याध्यापिका श्रीम .आ . ना . डावरे उपस्थित होते .
मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली
सारथी महाराष्ट्राचा
सोपान चंद्रकांत चव्हाण
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
Discussion about this post