सुलतानपूर : १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान शासनाच्या महसुल विभागाने सुरु केलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत ४ जानेवारी रोजी सुलतानपूर शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन स्थानीक तलाठी संतोष पनाउ व मंडळाधिकारी जे. एम. येऊल यांनी शेतकऱ्यांना ईपिक पाहणी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
१५ जानेवारी नंतर सहाय्यक ईपिक पाहणी सुरु होणार असून या पिक पाहणीतून सुटलेल्या शेतकऱ्यांचे पेरे नियुक्त असलेला सहाय्यक भरणार असल्याचे तलाठी पनाड यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगातले. यावेळी प्रकाश साखरे, मारोती उव्हळे, पत्रकार राजू पठाण, गजानन टकले अदी शेतकरी उपस्थीत होते.
Discussion about this post