आजरा. वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र या दिवशी सुरू केले होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते. त्यामुळं हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. यांचे औचित्य साधून आजरा मधील सर्व पत्रकार बंधूंचा सत्कार आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेत संचालकांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मृत्युंजय महान्यूजचे संपादक ज्योती प्रसाद सावंत यांनी सांगितले की आजच्या दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांचे दर्पण हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले.आजच्या या काळातही आजचे पत्रकार बंधू-भगिनी समाजप्रबोधनाचे हे महान कार्य पत्रकारितेच्या माध्यमातून करतात. त्यांच्या मुळेच जगातील सर्व लहान मोठ्या घडामोडींचे ज्ञान सर्वांना घरबसल्या पहायला, ऐकायला आणि वाचायलाही मिळते. यासाठी पत्रकारांचे अपार कष्ट व निर्भीड लेखणीच… नवोदितांना, नवयुवकांना व विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खरे प्रेरणास्त्रोत असून धाडसीही देते.
रणजित कालेकर पत्रकार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लेखनाची खरी आवड विद्यार्थ्याला शाळेतून विद्यार्थी दशेत रुजलं जातं. त्यासाठी दररोज विद्यार्थ्यांनी प्रार्थनेच्या वेळी अथवा घरी रोजचे वर्तमानपत्र मोठ्याने वाचणे आवश्यक आहे त्यामुळे वाचन कौशल्य आणि तसेच लेखन कौशल्यही सुधारुन जगाचे ज्ञान मिळते.पत्रकारांच्या महान कार्यामुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मदत झाली.
या सत्कार सोहळ्यासाठी आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष एस. पी. कांबळे, संचालक सचिन शिंपी, सुधीर जाधव ,के जी पटेकर, प्राचार्य आर जी कुंभार, पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे. शेलार ..त्याचबरोबर पत्रकार मोरे सर, सुनील पाटील,कृष्णा सावंत, विकास सुतार,गोपाळ गडकरी, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक पी.व्ही पाटील यांनी केले व आभार पी.एस. गुरव यांनी मानले.
Discussion about this post