
मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज भिगवण पोलीस स्टेशन आणि भिगवण रोटरी क्लबच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना सन्मानीत करण्यात आले. पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे साहेब उपस्थित होते.
सर्वांनी आपल्या भाषणात पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे दिनी पत्रकार दीन साजरा केला जातो.
बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण…. या नावाने वृत्तपत्र काढले होते. आरसा हा जसे आपण आहोत तसेच दाखवतो.. त्याच प्रमाणे जांभेकर यांनी त्या काळातील समाजातील परिस्थिती मांडली… समाजातील अनिष्ट रूढी विरोधात जन जागृती केली.. बाल विवाह… सतीची चाल.. केशव पण. आणि महीलांना शिक्षण बंद विरोधात समाजात जागृती केली होती.
म्हणून आज आपण थोडी फार प्रगती करू शकलो.. हे कार्य फार मोठे आहे. समजा मधे वैचारिक क्रांती करणारे आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी पत्रकारीतेची मुहूर्त मेढ रोवली. मराठी वृत्तपत्र काढून जनमानसात वैचारिक बदल केला. अन्यया विरोधात काम करण्याची प्रेरणा दिली..
इंग्रजी राजवट असतानाही त्यांनी समाजात बंधुभाव.. देश प्रेम स्वतःत्रता. या बाबत समाजात जागृती निर्माण केली….. विसाव्या वर्षी वृत्तपत्र काढने ते चालवने. कठीण काम होते. परंतु ते त्या समर्थपणे सांभाळले…. अवघे चाळीस वर्षे आयुष्य लाभले… कमी आयुष्य लाभून ही त्याचे त्यांनी सोने केले…. अशा महापुरुषास कोटी कोटी प्रणाम. उपस्थित सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
याप्रसंगी विविध पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी भिगवण पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे साहेब, पोलीस उपनिरिक्षक प्रवीण जर्दे,पोलीस उपनिरिक्षक हेमंत पाटील, रोटरीचे अध्यक्ष संतोष सवाने, संपत तात्या बंडगर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भिगवन परिसरातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
Discussion about this post