अहिल्यानगर शेवगाव दि ०८ शेवगाव तालुका शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्याकडे आज बुधवार दि ०८ रोजी तक्रार करण्यात आली आहे.
शेवगाव शहरामध्ये बस स्टॅन्ड, कॉलेज रोड, कापड बाजार, सोनार पेठ, मेन रोड या ठिकाणी रोड रोमियोंकडून मुलींची छेड काढण्याचे प्रकार सर्वात चालू आहेत. वाहनांवरील प्रेशर हॉर्न, बुलेटचे मोठाले आवाज तसेच वाहनांच्या रेस लावणे, महिला व मुलींना त्रास देणे इत्यादी प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.
तसेच शहरांमध्ये वर्दळीच्या ठिकाणी दादागिरी व गुंडगिरी करणे हेही प्रकार शहरात चालू आहेत.
ह्या घटना वर पोलिसांनी तात्काळ नियंत्रण आणून कायदा पायदळी तुडविणार्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी यावेळी शेवगाव शहर शिवसेना व तालुका शिवसेना यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी उपस्थित युवा सेना जिल्हा प्रमुख साईनाथ आधाट,आशुतोष डहाळे, शिवसेना तालुकाप्रमुख, शिंदे गट, कांबळे, कमलेश लांडगे, सचिन पन्हाळे, सोमनाथ मोहिते, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post