डोणगाव : राजकारणातील गारुडीही उपाधी ज्यांना आपसूकच लागलेली आहे त्या माजीमंत्री सुबोध सावजी यांचा वाढदिवस सप्ताह ३ जानेवारी पासून डोंणगावात सुरू आहे. याच वाढदिवस सोहळ्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या ना प्रतापराव जाधव यांची पूर्णवेळ हजेरी आश्चर्यासह चर्चेची ठरलेली असतांना दुसरीकडे मात्र जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणारी ठरली असली तरीही
सावजींचा वाढदिवसानिमित्त कौतुकाचे फवारे उडवत असतांना प्रतापराव जाधवांनी केलेली तुफान फटकेबाजी देखील चांगलीच चर्चेची ठरली आहे.सावजींच्या रूपाने संघर्षाच्या माध्यमातून मेहकर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस हद्दपार करणाऱ्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी आपल्या राजकीय परिपक्वतेची पावती दाखवत लावलेली हजेरी आणि सावजींच्या चिंमटयाना त्यांच्याच स्टेजवर सडेतोड उत्तर देत उभं केलेलं सावजींच नेतृत्व आणि त्याकाळातील त्यांचा संघर्षच लोकांसमोर उभा करत तुफान फटकेबाजी करत आपली विकेट तर टिकवून ठेवलीच मात्र त्यासोबतच शतक ही पार केलं.०३ जानेवारी रोजी सावजींचा सर्वपक्षीय वाढदिवस सोहळा पार पडला. वयाची ८० वर्ष गाठलेल्या सावजींनी वाढदिवस देखील तितक्याच थाटात साजरा केला. बग्गीतून मिरवणूक, जेसीबी च्या माध्यमातून फुलांचा करवून घेतलेला वर्षाव, सर्वांसाठी केलेली जेवणावळी अन विचारपीठावर सर्वच पक्षातील नेतेगण ह्या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरलं. कार्यक्रम पत्रिकेत कुणाचेही नाव नसतांना ना प्रतापराव जाधव आणि आ संजय रायमूलकर यांची दोघांच्याहीसार्थकाना धक्का देणारी उपस्थिती कुठल्या तरी वेगळ्याच राजकारांची नांदी तर नाही ना.? असा प्रश्न उपस्थित करणारी होती तर ना जाधवांचे भाषण म्हणजे ह्या भाषणात माजीमंत्री सावजी, आमदार सिद्धार्थ खरात, श्याम उमाळकर यांची घेतलेली फिरकी ना. जाधवांच्या आजपर्यंत त्त्या अनुभवी राजकारणाची ओळख करून देणारी ठरली.आपली प्रतिमा आपले स्टेटस कायम ठेवत केलेली फटकेबाजी सर्वांना तर समजलीच परंतु मंत्रीमहोदयानी आपल्याला चिमटा घेतला की आपल्या ला मार्गदर्शन केले की समज दिली हे लवकर कळणार देखील नाही अशा शब्दात शालजोडीतून मारा करत सावजींना शतायुषी आयुष्याच्या शुभेच्छा देत अनेकांच्या हाताला ४४० चा झटका देखील दिला. खरं म्हणजे ना प्रतापराव जाधव सावजीचे निमंत्रण स्वीकारतील आणि स्वीकारले तरीही एव्हडा वेळ देतील असे कुणालाही स्वप्नात देखील वाटले नाही.सुबोधभाऊ सावजी सारखा चाणाक्ष व चतुर विरोधक समोर असल्याने आपण चुका टाळू शकलो, चुका होऊ दिल्या नाही. हे कबूल करत असतांना एकीकडे स्व भास्करराव शिंगणे, आयाजी पाटील,माजी आमदार भाऊसाहेब लोंढे, दुसरीकडे त्यावेळी राजकारणात दरारा असणाऱ्या सुबोधभाऊ सावजी यांचे बाजार समितीचे निवडणुकीत पॅनल असतांना देखील आम्ही तरुण मंडळींनी आमचे ११ पैकी ६ उमेदवार निवडणूक रिंगणात असतांना ह्या दोन्हीही गटाला धोबीपछाड करत कसे आपले अस्तित्व सिद्ध केले आणि हे लाल धुडक्यावाले म्हणून सावजी आम्हाला हिंणवायचे, तर निवडणुकीचा कुठलाही पूर्वानुभव नसतांना त्यांना देखील आमच्या लाल धुडक्याची किंमत कशी दाखविली हा किस्सा सांगितला व आम्ही कुणाचे पित्तु नसल्याचे दाखवून दिले.माजी आमदार दाळू गुरुजीच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या ह्या सोहळ्यात विचारपीठावर माजीमंत्री सुभाष ठाकरे, माजी आमदार तोताराम कायंदे, श्याम उमाळकर व आदी दिग्गज विराजमान होते. मेहकर विधानसभा निवडणूक आणि सावजींना सांगितलेले विजयाचे गणित आणि काँग्रेसच्या उमेदवारपेक्षा २०० मते अधिक मिळवून आपण कसे दुसऱ्या क्रमांकावर राहलो हा सांगितलेला किस्सा यामुळे सभास्थळी चांगलीच खसखस पिकलीआमदार खरातांनाही दाखवला आरसाआमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर ना. जाधवांनी स्तुतीसुमने उधळत दुसरीकडे त्यांना आरसा देखील दाखवला. सिद्धार्थ खरात हे नशीबवान आहेत, अवघ्या २० दिवसात ते आमदार झाल्याचे ना. प्रतापराव जाधवांनी तोंडभरून कौतुक केले. आ. खरात यांनी उद्योग व आदी बाबतीत मेहकर मतदारसंघात विकासाचा अनुशेष असल्याने व हा अनुशेष भरून काढण्यासाठी सहकार्य अपेक्षित असल्याचे आपल्या भाषणात म्हटले होते. तो धागा पकडून ना. प्रतापराव जाधव म्हणाले की, खरात साहेब तुम्हाला प्रशासनाचा दांडगा अनुभव. राजकारातला एकदा अनुभव घेऊन पहा. बाल हनुमानाला सूर्य हा सुंदर फुलासारखा भासला होता. त्याला घेण्यासाठी हनुमानाने त्याच्याकडे धाव घेतली आणि त्यात तोंड भाजून हनुमान कसा माघारी फिरला है उदाहरण सांगत त्यांना ह्या दृष्टांताच्या माध्यमातून नेमके काय सांगायचे ही दिशा स्पष्ट करत त्यावेळी समृद्धी महामार्ग नसल्याने मेहकर ला कंटेनर येण्यासाठी कसे २५ तास लागायचे हे सांगितले. कुठलाही उद्योग उभा करायचा असेल तर त्यासाठी भौगोलिक व इतर पूर्तता असणे गरजेचे असते, तेव्हाच उद्योग उभे राहू शकतात. बोलणे सोपे परंतु करणे कठीण असल्याचे सांगून त्यांनी वस्तूस्थितीचा आरसा दाखवून देत सन्मान कायम राखत त्यांचा प्रश्न निकाली काढला. तर सुबोधभाऊ सावजी राजकारणात अॅक्टिव्ह असले की आपले मताधिक्यात चांगली वाढ होत असल्याने सुबोधभाऊनी राजकारणात तितक्याच दमाने व जोमाने सक्रिय राहण्याचा सल्ला देत चौफेर केलेली फटकेबाजी
Discussion about this post