विहिरगांव प्रतिनिधी:-रजत चांदेकर

राळेगाव तालुक्यातील रिधोरा परिसरामध्ये जंगली डुकरांचा धुमाकूळ असल्याने शेतकऱ्यांच्या तुर पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे रिधोरा, पिंपळापूर, उमरेड, खैरगाव, एकुर्ली, चाचोरा, धुमका, विहीरगाव, वेडशी, चिखली, वाढोणा बाजार, लाडकी, खडकी येथील शेतकऱ्यांच्या तुर पिकांचे जंगली डुकराने मोठे नुकसान केले असल्याचे दिसून येत आहे. तर जंगली डुक्करांन कडून होत असलेल्या नुकसानी मुळे शेतकरी आपल्या शेतात विविध उपाय योजना करत आहे. तर काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळेस फटाके फोडण्याचे काम चालू केले आहेत तर काही शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतातच राहून जंगली डुकरांना हाकलत असल्याचे दिसून येत आहे. तर काही शेतकरी आपल्या शेतात शेकोटी करून रात्र जागून काढत असल्याचे दिसून येत आहे. तर जंगली डुकराने मोठ्या प्रमाणात तूर पिकाचे नुकसान केले आहे. तर रात्री सात ते दहा वाजेपर्यंत या परिसरातील रस्त्याने येजा करणाऱ्या दुचाकी चालकास बऱ्याच वेळेस जंगली डुकराने गाडीला धडक देऊन जखमी केले आहेत तर अशातच काही दुचाकी चालकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहेत तर काही दुचाकी चालकांना कायमचे अंधत्व आले आहेत तर काही दुचाकी चालकांना किरकोळ इजा पोचून कोणाच्या हाताला तर कुणाच्या पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे. रात्रीच्या वेळेस दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत घेऊन या परिसरामध्ये ये. जा. करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. रिधोरासह परिसरात जंगली डुकरामुळे शेतकऱ्यांच्या तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने याबाबत वनविभागाने वेळेत लक्ष देऊन जंगली डुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व दूचाकी चालकाकडून होताना दिसत आहे
Discussion about this post