छत्रपती खासदार उदयनराजे भोसलेना निमंत्रण
उमरखेड, दि.१९ (तालुका प्रतिनिधी)
मागील साडेतिन वर्षा पासुन शहरातील सर्वच शिव प्रेमीना प्रतिक्षेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा उभारणीच्या कामाला वेग आला असून संभाव्य पुढील संप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराजांच्या अश्वारूढ पुतळा भूमिपुजन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज
यांचे वशंज श्रीमंत खासदार उदयनराजे भोसले यांची १६ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन भाजपा पक्षाचे जिल्हा समन्वयक नितिन भुतडा यांनी त्यांच्या हस्ते अश्वारुढ पुतळा भूमिपूजन करन्यांचे निमंत्रण दिले आहे.
नगर परिषद लगतच्या समोरील भागालगचे चार हि जिर्ण अवस्थेत झालेले दुकाणे पाडण्यात आली असुन प्रशासन कडुन अश्वारुढ पुतळा उभारणी साठी प्रशासकीय स्तरावर पुर्ण बांधकाम करण्यासाठी अवश्यक तांत्रिक प्रक्रीया अंतिम टप्यात
आटोपली आली आहे अशी माहिती हि या अनुषंगाने दिली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांना माननाऱ्या चाहत्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Discussion about this post