शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेत पात्र महिल्यांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. पुण्यात शनिवारी या कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. त्यानंतर राज्यातील योजनेत पात्र ठरलेल्या महिल्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. यामुळे राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील महिला भारावल्या आहेत.
रक्षबंधनाच्या दिवशी आणि 3-4 दिवस अगोदर पासूनच
माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले. त्यामुळे राज्यभरातील महिलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. यातून शहापूर तालुक्यातील महिलांनी भावाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट म्हणून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ठाणे ग्रामीण च्या सौ. कल्पनाताई तारमळे यांच्या नेतृत्वाखाली सौ. घोलप, कविता कोर, कविता विशे, पडवळ ताई, तसलीम कोतवाल आदी पदाधिकाऱ्यांनी अजितदादा यांना पोस्ट ऑफिस मधून राख्या पाठवल्या आहेत.
तालुक्यातील जवळपास 250-300 महिला भगिनींकडून लाडक्या भावाला म्हणेज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राख्या पाठवल्या गेल्या आहेत.तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी कडून शहापूर पोलीस स्टेशन मधील कर्मचारी, RTO पोलीस कर्मचारी,तहसीलदार, शासकीय विश्रामगृह मधील कर्मचारी यांना राख्या बांधून आजचा रक्षाबंधन सण पार पाडला आहे.
अजितदादा पवार यांना राख्या पाठविताना आणि शहापूर शहरातील शासकीय कार्यालय कर्मचारी वर्गाला राख्या बांधताना एक अनोखा आनंद महिला भगिनींच्या डोळ्यात दिसत होता.
Discussion about this post