वरोरा तालुक्यातील नागरी हे गाव वर्धा तिल हिंगणघाट तालुक्याच्या अगदी लगत असल्यामुळे तेथील शेतकरी बांधव बाजारपेठे करिता व नागरिक दवाखान्याकरिता, विद्यार्थी शिक्षणाकरिता अतिशय जवळील तालुका असून तेथील बाजारपेठ मोठी असल्यामुळे सतत दळणवळण सुरू असते. अगदी 15 किलोमीटरच्या दूरवर असलेलं हिंगणघाट हा अतिशय सोयीस्कर असल्यामुळे या तालुक्याशी जोडणाऱ्या पोथरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सतत पुराचा फटका या मार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांना होत असतो. कित्येक दिवस पूर परिस्थितीमुळे हा मार्ग बंद राहतो त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो परंतु या नदीवरील पुलाचे उंची वाढवून नवीन पूल बांधला गेल्यास नागरिकांना सोयीस्कर होईल त्यामुळे या नदीवरील पुलाची उंची वाढून देण्याबाबत दिनांक 10 {01} 2025 रोजी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सुरज प्रमदोराव धात्रक यांनी केंद्रीय इतर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री हंसराजजी अहिर यांना निवेदन स्वरूपी विनंती करून मागणी केली..
Discussion about this post