
🔸महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संतप्त..
🔹रात्र भर होतोय मोठ – मोठ्या ट्रक
ने अवैध रित्या रेती वाहतूक..
जांब/वार्ताहर✍️
मोहाडी(जांब) :- मोहाडी तालुक्यातील जांब येथे गेल्या पाच सहा महिन्या अगोदर जांब मार्गे होत असलेल्या अवैध रेती वाहतूक थांबविण्याकरिता व त्या वाहतुकीमुळे होत असलेल्या गावाच्या रस्त्याचा नुकसान थांबविण्याकरिता जांब ग्रामपंचायत व जांब गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केला होता. आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासन आंधळगाव व महसूल विभाग मोहाडी यांनी येऊन जांब येथील गावकऱ्यांना व ग्रामपंचायत सरपंच यांना रास्ता रोको आंदोलन थांबविण्यास सांगितले व यानंतर या मार्गाने कोणत्याही प्रकारची रेती वाहतूक होणार नाही असे आश्वासन दिले परंतु महसूल विभागाने सांगितल्यानुसार काहीही झालेला नाही. पुन्हा रामटेक तुमसर मार्गाने जांब येथून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ट्रकच्या सहाय्याने रेती वाहतूक केली जात आहे. ही रेती वाहतूक ट्रक व टिप्परने खुलेआम केली जात आहे. रात्रभर ट्रक चालत असल्याने जांब व लोहारा मार्ग पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. रोडावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने जांब लोहारा गायमुख ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे व या रोडाने अपघाताला आमंत्रण द्यावा अशी स्थिती सध्या या रोडाची आहे मात्र महसूल विभाग गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे. आश्वासन देऊन दुर्लक्ष करत असलेल्या महसूल विभागाने अजून कोणतीही कार्यवाही न केल्याने जांब लोहारा गायमुख येथील नागरिक पुन्हा आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. काही दिवसा अगोदर ह्याच मार्गाने दोन मोठे अपघात झालेले आहेत तरीसुद्धा महसूल विभाग होत असलेल्या प्रकाराकडे सर्रासपणे दुर्लक्ष करीत आहे. एका महिन्यानंतर महाशिवरात्री आहे गायमुख देवस्थान (लहान महादेव) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असते त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. सर्व भाविक भक्तांना जाम लोहारा मार्गानेच ये-जा करावा लागतो. परंतु या अस्वस्थ झालेल्या रोडामुळे यात्रेकरूंच्या अपघात होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे जर मोठ्या-मोठ्या ट्रक ने रात्रपाळीत होत असलेल्या रेती वाहतूक थांबली नाही तर जांब-लोहारा मार्गाची दिशा व दशा बदलून जाईल. महसूल विभाग जागा होऊन कटाक्षाने कारवाई करेल व जीवित हानी होण्यापासून वाचवेल अशी आशा जांब,लोहारा,गायमुख येथील नागरिकांना आहे. परंतु आता महसूल विभाग काही कार्यवाही करतो की पुन्हा सर्व असच सुरू राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे..
Discussion about this post