
✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
संपर्क 📲9423170716
एटापल्ली – स्थानिक एटापल्ली येथे भगवंतराव कला व विज्ञान महाविद्यालयाचे वतीने एटापल्ली येथील विविध शाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० स्कूल कनेक्ट २.० अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाअंतर्गत वर्ग ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील तज्ञ मार्गदर्शक डाॅ. महेश जोशी यांनी माहिती देतांना सांगितले की, ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलाच्या अनुषंगाने अप्रेंटीसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी), इंटर्नशिप, भारतीय ज्ञान प्रणाली, स्वयंम, पीएम विद्यालक्ष्मी लोन स्किम, पीएम उच्च तर शिक्षा प्रोत्साहन आणि साथी (सेल्फ-असेसमेंट, टेस्ट अँड हेल्प फॉर एन्ट्रन्स एक्झामिनेशन) हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने नववी ते बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थीकेंद्रीत शिक्षणाची मूलभूत तत्त्वे प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे’.
या कार्यशाळेचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन बुटे होते. तर प्रमूख अतिथी म्हणून
प्रा. डॉ. संदिप मैंद, प्रा. डाॅ. विनोद पत्तीवार, प्रा. डाॅ विश्वनाथ दरेकार.,प्रा निलेश दुर्गे, प्रा. डॉ शरदकुमार पाटील, प्रा. डाॅ राजीव डांगे, प्रा. राहुल ढबाले, डाॅ. श्रृती गुब्बावार, प्रा. चिन्ना पुंगाटी प्रा. भारत सोनकांबळे, प्रा. डॉ साईनाथ वडस्कर, प्रा. अतुल बारसागडे आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डाॅ बाळकृष्ण कोंगरे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्कूल कनेक्ट २.० चे महाविद्यालयीन समन्वयक प्रा डाॅ शरदकुमार पाटील यांनी केले..
Discussion about this post